‘झुम कार’बरोबर टाटा मोटर्सची हातमिळवणी

Zoom-car
पुणे – टाटा मोटर्सने कार भाड्याने देणाऱ्या झुम कारसोबत करार केला असून टाटा मोटर कंपनी या करारातून ईलेक्ट्रीक सेडा टीगॉर ही कार पुण्यातील ग्राहकांना भाड्याने देणार आहे.

झुम कारने टाटा मोटर्सच्या सहकार्याने पुढील वर्षात ५०० ईलेक्ट्रीक वाहने २० शहरात भाड्याने देण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. ग्राहकांना पहिल्या १० टिगॉर कार झुमकारच्या माध्यमातून उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. टाटा मोटर्सचे उपाध्यक्ष (ईलेक्टिरीक मोबाईलिटी व्यवसाय आणि कॉर्पोरेट धोरण) शैलेश चंद्रा आणि झुम कारचे मुख्य कार्यकारी अधिकारी ग्रेग मोरान यावेळी उपस्थित होते.

टाटा टिगॉर ईव्ही कार स्वंयचलित पद्धतीने झुम कारकडून भाड्याने देण्यात येणार आहे. यातून प्रदूषणमुक्त कारचा पर्याय पुणेकरांना उपलब्ध होणार आहे. ईलेक्ट्रिक वाहनांचा वाढत्या वापर हे सरकारचे व्हिजन आहे. टाटा मोटर्स या व्हिजनप्रमाणे कटिबद्ध असून त्याप्रमाणे एकत्रितपणे भागीदारबरोबर काम करत आहेत. यातून ईलेक्ट्रिक वाहने नागरिकांना त्वरित उपलब्ध होणार आहेत.

Leave a Comment