40 वर्षांच्या व्यक्तीशी 12 व्या वर्षी झाले लग्न, 23 वर्षांमध्ये झाली 44 मुलांची आई

mariam0
मुकुनो – युगांडा मधील एका गावातील महिलांना येथील लोक मुले जन्माला घालण्याची मशीन म्हणूनच ओळखतात. त्यामागचे कारण म्हणजे येथील एका महिलेने लग्नानंतर 23 वर्षांत तब्बल 44 मुलांना जन्म दिला होता. विशेष म्हणजे असे तिच्याकडून एका आजारामुळे असे घडले होते. ती प्रेग्नंसीनंतर या आजारामुळे अनेकदा एकापेक्षा जास्त मुलांना जन्माला घालत होती. 13 वेळा डिलिव्हरीमध्ये या महिलेने एकापेक्षा जास्त मुलांना जन्म दिला. जुळ्यापासून एकावेळी चार मुलांना त्यात जन्म दिल्याचा समावेश आहे. तिने अशा एकूण 36 मुलांना जन्माला घातल्यानंतर तिने गर्भाशय काढून टाकले. अनेक वर्षांपासून महिलेचा पती तिच्याबरोबर राहत नसल्यामुळे या मुलांची जबाबदारी तिच्यावर आली आहे.
mariam
ही घटना युगांडाच्या मुकुनोमधील कम्पाला गावातील आहे. येथील 39 वर्षीय महिला मरियम नबातांजी हिची 44 मुले आहेत. त्यापैकी 6 जणांचा मृत्यू झाल्याने तिच्याकडे 38 मुले जीवंत आहेत. त्यापैकी 10 मुली आणि इतर मुले आहेत. ती एका आजारामुळे प्रत्येकवेळी गर्भवती राहिल्यानंतर एकापेक्षा जास्त मुलांना जन्माला घालत होती. ‘हायपर ओव्युलेशन’ (अतिरिक्त अंडोत्सर्ग) असे या मेडिकल कंडिशनला म्हटले जाते. त्याच मासिक पाळीदरम्यान महिलेच्या गर्भात एकापेक्षा जास्त अंडी रिलीज होतात. डॉक्टरांच्या मते ही प्रोसेस जेनेटिक असते. लग्नानंतर पुढच्या 23 वर्षांत महिलेने सहा वेळी जुळ्या, चार वेळी तिळ्या आणि तीनवेळा चार बाळांना जन्म दिला. म्हणजे 36 मुलांचा जन्म तर 13 प्रेग्नंसीमध्येच झाला. इतर आठ मुले तिने एका वेळी एक जन्माला घातली.
mariam1
मरियमचे 1993 मध्ये 12 वर्षांची असताना 40 वर्षांच्या एका व्यक्तीशी लग्न झाले. आधीच तो विवाहित होता. त्याला अनेक मुले होती. मरियम म्हणते की, मी तेव्हा पार लहान होते आणि मला काहीही कळत नव्हते. लग्नानंतर वर्षभरात 1994 मध्ये वयाच्या 13 व्या वर्षी मरियम पहिल्यांदा आई बनली. जुळ्या बाळांना तिने जन्म दिला. त्यानंतर दोन वर्षांनी तिळे जन्माला घातले. तर त्यानंतर दीड वर्षांनी चार मुलांना जन्म दिला. 23 वर्षांची होईपर्यंत ती 25 मुलांची आई बनली होती. डिसेंबर 2016 मध्ये तिने शेवटच्या मुलाला जन्म दिला. त्यानंतर शरीर कमकुवत होत असल्याने तिला डॉक्टरांनी आणखी मुले जन्माला न घालण्याचा इशारा दिला. नंतर गर्भाशय काढून तिने या त्रासापासून सुटका करून घेतली.
mariam2
याबाबत महिला म्हणते की, माझ्यासाठी एवढी मुले काही विशेष बाब नाही. वेगवेगळ्या महिलांपासून माझ्या वडिलांना 45 मुले होते. ते सर्वही एकाचवेळी पाच, चार आणि तीन अशी जन्मली होती. मरियम सर्व मुलांना स्वतःच सांभाळते. तिचा पती तिच्यावर खूप अत्याचार करायचा आणि अनेक वर्षांपूर्वी तिला सोडून गेला होता. ती तेव्हापासून एकटी राहते आणि मुलांना सांभाळते. तिचा पती कधीतरी रात्री येतो आणि सकाळी निघून जातो असे ती सांगते. मोठी मुले तरी पित्याला चेहऱ्याने ओळखतात पण लहान्यांना त्यांचा चेहराही माहिती नसल्याचे मरियम म्हणते. आर्थिक अडचणींमुळे मुलांना सांभाळण्यात अडचण येत असल्याचे ती सांगते.