पर्थच्या खेळपट्टीबाबत आयसीसीने दिला धक्कादायक निर्णय

ICC
दुबई – पर्थ येथे ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यात झालेला दुसरा कसोटी सामना ऑस्ट्रेलियाने १४१ धावांनी जिंकत मालिकेत १-१ ने बरोबरी साधली. आयसीसीने या सामन्यानंतर खेळपट्टीची तपासणी केली असता आयसीसीने या तपासणीत पर्थच्या खेळपट्टीला साधारण दर्जा दिला आहे.

खेळपट्टीवर चेंडूला असाधारण उंची मिळत असल्याचे आयसीसीचे सामनाधिकारी रंजन मदुगले यांना निदर्शनास आले. खेळपट्टीत सुधारणा होण्यासाठी आयसीसीने ५ रेटिंग पद्धतीचा वापर केला आहे. यामध्ये व्हेरी गुड, गुड, अॅव्हरेज, बिलो अॅव्हरेज, पुअर अशी वर्गवारी केली जाते. पर्थच्या खेळपट्टीला आयसीसीने अॅव्हरेज असे रेटिंग दिल्यामुळे खेळपट्टीच्या दर्जावरुन आयसीसी क्रिकेट ऑस्ट्रेलियाला तंबी देवू शकते. सामन्यामध्ये शमीने टाकलेल्या एका चेंडूवर अॅरोन जखमी झाला होता. भारतीय खेळाडूही वाकाच्या खेळपट्टीवर झगडताना दिसून आले.

Leave a Comment