जीएसटी; दैनंदिन वापराच्या 33 वस्तू होणार स्वस्त!

arun-jaitley
नवी दिल्ली: आज (शनिवार) नवी दिल्ली येथे केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या अध्यक्षतेखाली 31 व्या जीएसटी परिषद पार पडली. सध्या 28 टक्के जीएसटी दैनंदिन वापराच्या अनेक वस्तूंवर आकारला जात असल्यामुळे अनेक वस्तू महागल्या आहेत. परिणामी 33 वस्तूंवरील जीएसटीचा दर आजच्या बैठकीमध्ये कमी करण्यात आला आहे. पूर्वी ज्या वस्तूवर 18 टक्के जीएसटी आकाराला जात होता. तो आता कमी करून त्या वस्तू 12 टक्के जीएसटीच्या श्रेणीमध्ये आणण्यात आल्या आहेत. तर 12 टक्के जीएसटी ज्या वस्तूंवर आकाराला जात होता अशा काही वस्तूंचा 5 टक्के जीएसटीच्या श्रेणीमध्ये समावेश करण्यात आला आहे. लग्झरी वस्तूंच्या गटात मोडणाऱ्या वस्तू वगळता इतर सर्व वस्तूंचा समावेश 18 टक्के जीएसटी श्रेणीमध्ये समावेश करावा अशी मागणी काँग्रेसने केली होती, अशी माहिती व्ही नारायणसामी यांनी दिली.

Leave a Comment