शाओमीने लाँच केले मी पे अॅॅप

mi-pay
भारतात ऑनलाईन देवघेव वेगाने लोकप्रिय होत असताना या क्षेत्रात नवे खेळाडू एन्ट्री घेत आहेत. अर्थात आज या क्षेत्रात पेटीएमची आघाडी असली तरी अन्य कंपन्याही ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नवनवीन कल्पना राबवीत आहेत. त्यात आता भारतीय स्मार्टफोन बाजारावर वर्चस्व मिळविलेल्या चीनी शाओमीने दिगीतल पेमेंट क्षेत्रात पाउल टाकले असून त्यांचे मी पे अॅप लाँच केले आहे.

शाओमीने यासाठी आयसीआयसीआय बँक आणि पे यु पेमेंट यांच्याशी भागीदारी केली आहे. मी पे वर सर्व मोठ्या बँकांची डेबिट क्रेडीट कार्ड वापरता येणार आहेत. गुगल पे आणि व्हॉटसअपवर हि सुविधा उपलब्ध नाही. मी पे वरून युजर युपीआय च्या माध्यमातून पैसे ट्रान्स्फर करून शकणार आहेत तसेच स्वीकारू शकणार आहेत. मोबाईल फोन, वीज, पाणी, गॅस अशी बिले येथून भरता येतील.

कंपनीने युजरचा डेटा सुरक्षित राहील असा दावा केला असून युजर जनरेट डेटा भारतातील कंपनीच्या क्लाऊड इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये सेव आणि स्टोअर होणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

Leave a Comment