टी-२०मध्ये ‘अशी’ कामगिरी करणारा ‘राशिद खान’ ठरु शकतो पहिलाच गोलंदाज

rashid-khan
दुबई – एका वर्षात टी-२०मध्ये १०० बळी घेणारा पहिलाच खेळाडू अफगाणिस्तानचा फिरकीपटू राशिद खान ठरु शकतो. यावर्षी राशिदने आतापर्यंत ९२ बळी घेतले आहेत. १०० बळींचा पल्ला गाठण्यासाठी त्याला अद्याप ८ बळींची गरज आहे. सध्या बिग बॅश लीगमध्ये राशिद खेळत असल्यामुळे असा पराक्रम करण्याची चांगली संधी त्याच्याकडे असेल.

सध्या राशिद खान २० वर्षांचा असून बिग बॅश लीगमध्ये तो अॅडलेड स्ट्रायकर्स संघाकडून खेळत आहे. याआधी एका वर्षात टी-२० मध्ये सर्वात जास्त बळी घेण्याचा विक्रम विंडीजच्या ड्वेन ब्राव्होच्या नावावर होता. २०१६ साली त्याने एका वर्षात ८७ बळी घेतले होते.

बिग बॅश लीग २०१९ च्या पहिल्याच सामन्यात राशिद खानने १९ धावा देत ३ बळी घेत चांगली कामगिरी केली. त्याच्याबद्दल बोलताना अॅडलेड स्ट्रायकर्सचा त्याचा सहकारी अॅलेक्स कारे म्हणाला, भरपूर गुणवत्ता त्याच्याकडे आहे. परंतु, तो त्याच्या खेळात सुधारणा करण्यासाठी इतर खेळाडूंपेक्षा कठोर मेहनत घेतो.

Leave a Comment