रिझर्व्ह बँकेचे पेटीएमच्या डिजिटल पेमेंट बँकेवर निर्बंध

PayTM
मुंबई: भारतीय रिझर्व्ह बँकेने पेटीएमच्या डिजिटल पेमेंट बँकेवर निर्बंध घातले आहेत. ऑगस्ट महिन्यापासून पेटीएम डिजिटल पेमेंट बँकेत आणि ई वॉलेटवर नवीन खाती सुरु करण्यास निर्बंध लादण्यात आले आहेत. खातेदारांच्या केवायसीसंबंधी (नो यूवर कस्टमर) नियमांचे पेटीएमने उल्लंघन केल्याप्रकरणी हे निर्बंध घालण्यात आले आहेत.

पेमेंट बँकेसंबंधित रिझर्व्ह बँकेने घालून दिलेल्या नियमांचे पेटीएमकडून उल्लंघन करण्यात आले आहे. पेमेंट बँकेत एका खात्यात जास्तीत जास्त एक लाखांची रक्कम ठेवता येते. बँकेला शंभर कोटी रुपयांचे नेटवर्थ राखणे देखील गरजेचे आहे. शिवाय बँकेतील पेटीएमचे प्रवर्तक विजयशेखर शर्मा यांचा हिस्सा 51 टक्क्यांवर पोचला आहे. तर इतर भांडवल इतर काही कंपन्या आणि 97 कम्युनिकेशन्सकडे आहे. मात्र त्यात देखील शर्मा यांची हिस्सेदारी असल्याने अप्रत्यक्षरीत्या बँकेतील त्यांच्या हिस्सा अधिक आहे.

Leave a Comment