डब्ल्यू.व्ही रमन भारतीय महिला संघाचे नवे प्रशिक्षक

WV-Raman
मुंबई – भारताचे माजी सलामीवीर फलंदाज डब्लू.व्ही. रमन यांची भारतीय महिला संघाच्या प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली आहे. गॅरी कर्स्टन, मनोज प्रभाकर, ब्रॅड हॉग आणि व्यंकटेश प्रसाद यांनी एकूण २८ जणांनी अर्ज केलेल्या यादीत अर्ज केले होते. परंतु, रमन यांची यातून निवड करण्यात आली.

बीसीसीआयने गुरुवारी २० डिसेंबरला रमन यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. बीसीसीआयने नेमलेल्या त्रिसदस्यीय कमिटीत असलेल्या कपिल देव, अंशुमन गायकवाड आणि एस. रंगास्वामी यांनी २८ जणांची मुलाखत घेतल्यानंतर रमन यांची निवड केली.

गेल्या कित्येक वर्षापासून रमन यांना नॅशनल क्रिकेट अकादमी, भारत अ आणि दुलीप ट्रॉफी संघाला प्रशिक्षण देण्याचा अनुभव आहे. रमन यांनी भारतीय संघाकडून १९८२ ते १९९९ पर्यंत ११ कसोटी आणि २७ एकदिवसीय सामने खेळले आहेत. भारताला २०११ साली विश्वकरंडक जिंकून देण्यात महत्वाचा वाटा उचलणारे गॅरी कर्स्टन यांच्या नावाची जोरदार चर्चा होती. परंतु, आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचे प्रशिक्षकपद सोडण्यास त्यांनी नकार दिला.

Leave a Comment