एअरटेलचा १६९ रुपयांचा प्लॅन लाँच

Airtel
टेलिकॉम सेक्टरमध्ये रिलायन्स जिओने प्रवेश केल्यापासून इतर कंपन्यांचे धाबे दणाणले आहेत. आयडिया, व्होडाफोन आणि एअरटेलसारख्या कंपन्यांनी जिओला टक्कर देण्यासाठी आपले स्वस्तातील प्लॅन जाहीर केले. एअरटेलने नुकताच आपला एक प्लॅन लाँच केला आहे. ग्राहकांना त्यामध्ये अतिशय आकर्षक सुविधा मिळणार आहेत. १६९ रुपयांचा हा प्रीपेड प्लॅन असून मागील आठवड्यात तो लाँच करण्यात आल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे.

जिओच्या १४९ रुपयांच्या प्लॅनला हा प्लॅन टक्कर देणार आहे. ग्राहकांना या १६९ रुपयांच्या प्लॅनमध्ये अनलिमिटेड मोफत लोकल आणि एसटीडी कॉल तसेच २८ दिवसांसाठी रोज १ जीबी डेटा मिळणार आहे. तसेच या प्लॅनमध्ये रोज १०० मेसेज मोफत मिळणार आहेत. २८ दिवसांची वैधता असलेल्या या प्लॅनमध्ये मोफत कॉलिंग असे म्हटले असेल तरीही ग्राहकांना या प्लॅनमध्ये रोज २५० मिनिटे आणि आठवड्याला १००० मिनिटे मोफत मिळणार आहेत. त्यानंतर १.२ पैसे प्रती सेकंद किंवा १ रुपया प्रती मिनिट या हिशोबाने रक्कम लागू होईल.