चला फिनलंडला, सँटाच्या गावाला

village
थंडीचे दिवस सुरु झाले कि वेध लागतात नाताळचे. बच्चे कंपनी या नाताळात सँटा आपल्याला काय गिफ्ट देणार याची स्वप्ने रंगवू लागते. घरात क्रिसमस ट्री सजविले जाते आणि नातेवाईकांच्या भेटीगाठी, एकत्र मेजवान्या अश्या माहोलात कडाक्याच्या थंडीचा विसर पडतो. लहान मुलाना नाताळच्या भेटवस्तू देणारा हा सँटा खरच अस्तित्वात आहे का हा प्रश्न अनेकांना पडतो मात्र या सँटाचे एक गाव अस्तित्वात आहे आणि ते आहे अतिथंड देश फिनलंड मधील रोवानेमी येथे.

santa
वास्तवात हे एक अॅम्युझमेंट पार्क आहे. मात्र केवळ लहानग्याचेच नाही तर थोरामोठ्यांनासाठी सुद्धा हे मोठे आकर्षण आहे. जगभरातून पर्यटक या गावाला भेट द्यायला येतात. या गावात सँटाचे कार्यालय गावातील सर्वात सुंदर इमारतीत आहे. येथे सँटा दररोज शेकडो पाहुण्यांना भेटतो. नाताळच्या दिवसात येथे दिवस खूप छोटा असतो आणि चहुबाजूला बर्फ असते. तेव्हा येथे क्रिसमस लाईट रस्ता दाखवीत असतो. या गावात सँटाच्या नावाचे पोस्टऑफिस आहे आणि तेथे जगभरातून सुमारे ५ लाख पत्रे येतात. यात मुलांनी त्यांच्या इच्छा व्यक्त केलेल्या असतात आणि या सर्व पत्राना उत्तरे दिली जातात.

येथे सँटाला प्रत्यक्ष भेटता येते, त्याच्या मांडीवर बसता येते आणि त्याच्याशी हस्तांदोलन करता येते. त्याच्या घराची लाकडात सुंदर सजावट केली गेली आहे. त्यामुळे एकदातरी सँटाच्या गावाला जायला हवेच.

Leave a Comment