सारस गणपतीबाप्पाने घातला स्वेटर आणि टोपी

ganesh
गेले काही दिवस पुण्याचे तापमान चांगलेच घसरले असून थंडीचा कडाका वाढला आहे. पुण्यातील नागरिकांचे श्रद्धेचे ठिकाण असलेल्या सारस बागेतील गणपतीला रिवाजाप्रमाणे थंडीसाठी लोकरीचा स्वेटर आणि लोकरीची टोपी असा पोशाख केला जात आहे. गेली तीस वर्षे हि प्रथा पाळली जात असून येथील एक कर्मचारी शशिकांत धर्माधिकारी यांनी बाप्पासाठी स्वेटर आणि टोपी आणली आहे. सरकारी नोकरीतून निवृत्त झाल्यावर धर्माधिकारी येथे सेवा करण्यासाठी येतात.

ते म्हणाले रात्री बाप्पाला स्वेटर आणि टोपी चढविली जाते आणि सकाळी पूजेच्या वेळी काढली जाते. सात दिवसांचे सात रंगाचे स्वेटर बाप्पासाठी तयार असतात. रात्रीच्या थंडीत स्वेटर टोपी घालून सजलेले बाप्पाचे ध्यान पाहण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणावर गर्दी करतात. हे गणपती मंदिर २५० वर्षे जुनें असून नानासाहेब पेशवे यांनी बांधलेले आहे. मंदिरात अतिशय सुरेख अशी संगमरवरी गणेश मूर्ती आहे.