…जॉन्सन अँड जॉन्सनवर कारवाई करणार सरकार !

johnson’s
नवी दिल्ली – हिमाचल प्रदेशातील बड्डी येथून जॉन्सन अँड जॉन्सन बेबी पावडरचे नमुने भारतीय औषध नियंत्रक सीडीएससीओ यांनी घेतले आहेत. कंपनी याप्रकरणी दोषी आढळल्यास कारवाई करणार असल्याचे हिमाचल प्रदेशाचे औषधी नियंत्रक नवनीत मारवाहा यांनी सांगितले.

कॅन्सरला कारणीभूत ठरणाऱ्या अॅस्बेस्टॉसचे अंश बेबी पावडरमध्ये आढळल्याचे वृत्तसंस्थेने म्हटले होते. वृत्तसंस्थेशी बोलताना मारवाह म्हणाले की, जॉन्सन जॉन्सन कंपनी बड्डी येथे व्हीहीएफ इंडियासोबत बेबी पावडरची निर्मिती करत आहे. माध्यमातील आलेल्या वृत्तानुसार आम्ही पाहणी केली आहेत आणि पावडरचे नमुने घेतले असून पुढील तपासणी करणार आहोत.

दरम्यान बेबी पावडरबाबतचे होणारे आरोप एकांगी व चुकीचे असल्याचे जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीने म्हटले आहे. त्याचबरोबर कंपनीने बेबी पावडर सुरक्षित असून अॅस्बेस्टॉस मुक्त असल्याचा दावा केला. पावडरमुळे कॅन्सर होत नसल्याचे १० हजारांहून अधिक पुरुष व स्त्रियांवरील सर्वेतून दिसून आले आहे. तसेच इतर स्वतंत्र चाचणी घेण्यात आल्याचा दावाही कंपनीने केला आहे.

Leave a Comment