नवी दिल्ली – दूरसंचार सचिव अरुणा सुंदरराजन यांची आर्थिक संकटात सापडेल्या रिलायन्स कम्युनिकेशन आणि नवे भागीदार जिओ या दोन्ही कंपन्यांच्या अधिकाऱ्यांनी भेट घेतली. स्पेक्ट्रमच्या सौद्यावरील थकबाकीवर तोडगा काढण्याबाबत या बैठकीदरम्यान चर्चा करण्यात आली.
दूरसंचार विभागाचा जिओ-रिलायन्स सौद्याला मंजुरी देण्यास नकार
दोन्ही कंपन्यामध्ये सौदा थकबाकी दिल्याशिवाय पूर्ण होणे शक्य नसल्याचे दूरसंचार अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. सरकारी सूत्राने मुकेश अंबानी यांनी आपले भाऊ अनिल यांच्या रिलायन्स कम्युनिकेशन्सचे थकित पैसे देण्यास नकार दिल्याचे सांगितले. थकित पेमेंट देण्याच्या स्थितीत दोन्ही कंपन्या असल्याने रिलायन्य आणि जिओमधील सौदा हा कागदोपत्री होणे शक्य नसल्याचे दूरसंचार विभागाने म्हटले आहे. थकित पैसे भरण्याचे आश्वासन रिलायन्स कम्युनिकेशनने दिल्याने राष्ट्रीय कंपनी लवाद आयोगाने कारवाई स्थगित केली आहे. रिलायन्सने सुमारे ४६ हजार कोटी रुपये थकविले आहेत.