आयसीसीने बीसीसीआयकडे नुकसान भरपाई मागणाऱ्या पीसीबीला दिला दणका

PCB
दुबई – आयसीसीने भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (पीसीबी) मध्ये द्विपक्षीय मालिकेवरुन झालेल्या सुनावणीत मोठा निर्णय घेतला आहे. बीसीसीआयकडे नुकसान भरपाई मागणाऱ्या पीसीबीला आता बीसीसीआयलाच नुकसान भरपाई देण्याचा आदेश आयसीसीने दिला आहे. हा निर्णय आयसीसीच्या डिस्पूट्स रिझोल्युशन्स कमिटीने सुनावला आहे.

आयसीसीने बीसीसीआयने नोंदवलेल्या तक्रारीनंतर निर्णय सुनावताना सांगितले, डिस्पूट पॅनेलच्या नोंदवलेल्या निरीक्षणानुसार बीसीसीसआयला ६० टक्के नुकसान भरपाई पीसीबीने द्यावी. बीसीसीआयला खटला लढवताना झालेल्या खर्चाबद्दल ही नुकसान भरपाई आहे. प्रशासकीय समितीचे प्रमुख विनोद राय यांनी आयसीसीच्या या निर्णयाचे स्वागत करताना बीसीसीआयकडून खटल्यात सहभागी झालेल्या व्यक्तींचे कौतुक केले आहे.

२०१३ सालापासून पाकिस्तानसोबत भारताने द्विपक्षीय मालिका खेळली नाही. त्यामुळे पीसीबीने २०१४साली बीसीसीआयविरुद्ध ६ कोटी २८ लाख ६८ हजार डॉलर्स नुकसान भरपाईचा खटला दाखल केला होता. आयसीसीच्या डिस्पूट पॅनेलने दुबईत झालेल्या ३ दिवसाच्या सुनावणीनंतर निर्णय सुनावताना पीसीबीचे सर्व आरोप फेटाळून लावत भारताने पाकिस्तान सोबत द्विपक्षीय मालिका खेळण्याचे कोणतेही बंधन नाही असे सांगितले.

Leave a Comment