निळ्या डोळ्यांची ही बाहुली खुप आहे भयंकर

doll
खेळणी म्हणजे लहान मुलांचा जीव की प्राण, त्यांना खेळणी खुप आवडतात. पण या खेळणी अनेक वेळा मोठ्या अडचणीचे कारण बनतात. एका बाहुलीविषयी अशीच एक घटना घडली. ही बाहुली निळ्या डोळ्यांची आहे. ही बाहुली खुप सुंदर दिसते पण यामागची कथा खुप भयंकर आहे. या बाहुलीकडे कुणी 30 सेकंद सतत बघत राहिले तर कोणाचीही किंकाळी बाहेर पडते.

सात वर्षांपुर्वी एका मुलीला ही बाहुली गिफ्ट करण्यात आली होती. मुलगी ही बाहुली मिळाल्यानंतर खुप आनंदी झाली. ती मुलगी सुरुवातीला दिवसरात्र या बाहुलीसोबत खेळायची. पण विचित्र घटना काही दिवसांनंतर घडू लागली. कारण ही बाहुली रात्र होताच मुलीच्या खोलीबाहेर आपोआप जायची.

याबाबत मुलांनी सांगितले की, रात्री ज्या ठिकाणी ते बाहुली ठेवायचे सकाळी त्या ठिकाणावर बाहुली नसायची. या कुटूंबातील सर्वात मोठी मुलगी 20 वर्षीय एंजीने सांगितले की, विचित्र आवाजाही रात्री यायचे. जसे की, कपाटाचे दार तीन वेळा उघडण्याचा आणि बंद होण्याचा आवाज, कुणी तरी दार वाजवत असल्याचा आवाज किंवा मग कुणाचा तरी चालण्याचा आवाज यायचा.

कुटूंबातील 18 वर्षांचा मुलगा स्टीवेन म्हणाला की, या बाहुलीला धक्का दिला तर ती बडबड करायची. आपण प्रार्थना करतो तसे ती प्रार्थना करायची. सर्व कुटूंब यानंतर घाबरले. घरातील लहान मुलांच्या चेह-यावर आणि शरीरावर एकदा सकाळी जखमांचे व्रण दिसले तेव्हा सर्व घाबरले. या बाहुलीमुळे हे सर्व होत असल्याचा दावा कुटूंबाचा आहे.

या कुटूंबाने सांगितले की, प्रेत-आत्माचा या बाहुलीमध्ये वास आहे. पेरुमध्ये राहणा-या या कुटूंबियांनी या घटनेनंतर भूत-प्रेत काबूमध्ये कणा-यांना बोलावले तेव्हा त्यांनी बाहुलीवर पवित्र जल शिंपडले. तेव्हा एक वेगळाच प्रकाश दिसू लागला. या बाहूलीने एका खोलीकडे इशारा करत तिथे महिलेची आत्मा भटकत आहे असे सांगितले.

Leave a Comment