बिगबॅश टी २० मध्ये बॅटीने केला गेला टॉस

toss
क्रिकेटचा कोणताही सामना प्रथम नाणेफेक केल्याशिवाय सुरु होत नाही. ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या बिग बॅश टी २० सामन्यात यंदा प्रथमच टॉस बाबत वेगळा प्रयोग केला गेला. नाणे फेकून टॉस करण्याची प्रक्रिया बदलून यावेळी चक्क बॅट उडवून टॉस केला गेला.

बिग बेश लीगच्या आठव्या सिझन मध्ये एडिलेड स्ट्रायकर्स आणि ब्रिस्बेन हिट याच्यामध्ये झालेल्या सुरवातीच्या सामन्यात प्रायोगिक स्वरुपात बॅट उडवून टॉस केला गेला. बुधवारी झालेल्या या सामन्यात एडिलेड टीमने टॉस जिंकला आणि या टीमचा कप्तान कॉलीन इंग्राम या पद्धतीने टॉस जिंकणारा पहिला कप्तान ठरला. दिग्गज फलंदाज मॅथ्यु हेडन याने बॅट उडवून टॉस केला. ही बॅत वेगळ्या प्रकारे तयार केली गेली होती. या बॅटच्या दोन्ही बाजू सपाट होत्या. याचा व्हिडीओ शेअर केला गेला आहे.

Leave a Comment