जग विमानसेवेने जोडले गेले आहे असे आपण म्हणत असलो तरी काही छोट्या देशात विमानसेवा अजूनही सुरु झालेली नाही कारण या देशांना त्यांचे स्वतःचे विमानतळ नाहीत. त्यामुळे शेजारी देशात विमानाने जायचे आणि अन्य वाहनांनी या देशांना भेट द्यायची अशी कसरत प्रवाशांना करावी लागते.
या पाच देशात जात नाही एकही विमान
आंडोरा या आकाराने अगदी लहान असलेल्या देशात विमानतळ नसला तरी तेथे ३ खासगी हेलीपॅड आहेत. या देशाला सगळ्यात जवळचा विमानतळ १२ किमीवर आहे. त्यामुळे त्यांना स्वतःच्या स्वतंत्र विमानतळाचे गरज नाही आणि जागा कमी असल्याने ते विमानतळ बांधुही शकत नाहीत.
मोनाको या पश्चिम युरोपीय देशातही विमानतळ नाही. फ्रांसच्या सीमेला लाफ्गुन असलेला हा छोटासा देश फ्रांसमधील विमानतळ वापरतो. म्हणजे या देशात येणारे प्रवासी फ्रांस विमानतळावर येतात आणि मग मोनाकोला जातात.
लीक्टनस्टीन या देशाचे नाव फार जणांना माहितीही नसेल. ऑस्ट्रिया आणि स्वित्झर्लंड या दोन देशांचा मध्ये हा देश आहे. येथे जर्मन भाषा बोलली जाते. या देशालाही स्वतःचा विमानतळ नाही मात्र हेलीपोर्ट आहे. हेलीपोर्ट मुळे पाणी अथवा जमिनीवर विमान उतरविणे शक्य होते.
सान मारियो या इटलीच्या सीमेवरील छोट्या देशातही विमानतळ नाही. या देशात जाण्यासाठी इटलीतील विमानतळाचा वापर करावा लागतो.
तर ख्रिस्चन लोकांचे पवित्र स्थळ असलेल्या व्हॅटिकन सिटी या छोट्याश्या देशालाही त्यांचा विमानतळ नाही. रोमच्या विमानतळावर उतरून येथे जाता येते. अर्थात येथे हेलिपोर्ट आहे. हा देश अवघ्या ११० एकर परिसरात आहे. त्यामुळे येथे विमानतळासाठी जागा नाही.