इशा अंबानीच्या लग्नाचे फोटो काढणारे फोटोग्राफर विवेक

vivek
भारतातील बडे उद्योजक मुकेश अंबानी यांची कन्या इशा आणि पिरामल ग्रुपचे अजय यांच्या मुलगा आनंद यांचा विवाह नुकताच पार पडला आणि या विवाहातील फोटोंची चर्चा सध्या सोशल मिडीयावर सुरु आहे. या लग्नात १ लाख २० हजार फोटो काढले गेले आणि ती संधी मिळाली होती कर्नाटकातील दावणगेरे येथील विवेक सिकेरा आणि त्यांचा भागीदार शंकर काटवे यांना.

या लागणासाठी दोन फोटोग्राफर टीम बोलावल्या गेल्या होत्या. त्यातील एक होती विवेक आणि शंकर याची. विवेक पिरामल याच्याकडून फोटो काढत होते. या बाबत माहिती देताना ते म्हणाले, जून महिन्यात ते युएस मध्ये फोटो काढण्यासाठी गेले होते तेव्हा तेथे एका माणसाने डिसेंबरमध्ये लग्नाचे फोटो काढायचे आहेत असे सांगितले. हे लग्न कुणाचे याची मला माहिती नव्हती. पण जेव्हा हे लग्न अंबानी आणि पिरामल याचे आहे हे कळले तेव्हा मला आश्चर्याचा धक्का बसलाच पण माझ्यासाठी हा टर्निंग पॉइंट ठरला आहे.

issha
पिरामल यांच्या घरात २,३ डिसेंबरला,प्री वेडिंगचे फोटो ८.९ डिसेंबरला उदयपुर येथे आणि बाकीचे फोटो मुंबईत लग्नाच्या वेळी काढले. आमची ६ फोटोग्राफर, ६ व्हिडीओग्राफर आणि ड्रोन टीम त्यासाठी कार्यरत होती. विवेक गरीब कुटुंबातले असून गरिबीमुळे त्यांना शिक्षण पूर्ण करता आले नाही. त्यांनी सुरवातीला पेट्रोल पंपावर काम केले आणि नंतर फोटोग्राफी शिकून १९९७ मध्ये विवेक स्टुडीओ सुरु केला. इशाच्या लग्नाचे फोटो काढण्याची संधी मिळाल्याने त्याचे नाव जगभर प्रसिद्ध झाले आहे.