मुंबई इंडियन्सची नवी जबाबदारी झहीर खानच्या खांद्यावर

zaheer-khan
जयपूर – माजी वेगवान गोलंदाज झहीर खानाला तीन वेळा इंडियन प्रीमियर लीगचा चॅम्पियन मुंबई इंडियन्सने नवी जबाबदारी दिली आहे. क्रिकेट संचलन निदेशकपदी त्याला नियुक्त केले असून याची घोषणा फ्रँचाइजीने त्यांच्या वेबसाइटवर केली आहे.

झहीर खानने या निवडीबद्दल मुंबई इंडियन्ससोबत परत जोडल्याने टि्वटद्वारे आनंद व्यक्त केला आहे. मुंबई इंडियन्स सोबत जोडल्याने आपल्या शहरात पुन्हा येणे हा आनंदाचा क्षण आहे. मी रोहित शर्मा आणि मुंबई इंडियन्सच्या खेळाडूची भेट घेण्यात खूपच उत्सुक असल्याचे टि्वटद्वारे व्यक्त केले आहे. झहीर २००९,२०१० आणि २०१४ साली मुंबई इंडियन्स संघाचा सदस्य होता. झहीरने फ्रँचाइजी कडून खेळताना ३० सामन्यात २९ बळी बाद केले आहे.

Leave a Comment