फुटबॉल विश्वातील मानाचा ‘गोल्डन शू’ पुरस्कार मेस्सीने पाचव्यांदा पटकावला

Lionel-Messi
नवी दिल्ली – बार्सिलोनाचा स्टार फुटबॉलपटू लियोनल मेस्सीला फुटबॉल विश्वातील मानाचा समजला जाणारा ‘गोल्डन शू’ हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. त्याने हा पुरस्कार लिव्हरपूलच्या मोहम्मद सलाहला मागे टाकत आपल्या नावे केला. मोहम्मद सलाहच्या नावावर २०१७-१८ या वर्षात ३२, तर मेस्सीच्या नावावर ३४ गोल आहेत. लियोनल मेस्सीचा हा ५ वा ‘गोल्डन शू’ पुरस्कार आहे.

टॉटेनहॅमचा हॅरी केन सर्वाधिक गोल करण्याच्या यादीत तिसऱ्या स्थानावर असून त्याने ३० गोल केले आहेत. चौथ्या क्रमांकावर रियल माद्रिदचा माजी खेळाडू आणि युव्हेंट्सचा स्टार स्ट्रायकर ख्रिस्तियानो रोनाल्डो आहे. २६ गोल त्याच्या नावावर आहेत.


२००९-१०, २०१०-११, २०१२-१३, २०१६-१७ आणि २०१७-१८ या वर्षी हा पुरस्कार जिंकण्यात मेस्सीला यश आले आहे. ख्रिस्तियानो रोनाल्डोचा त्यापाठोपाठ नंबर लागतो, या पुरस्कारावर त्याने ४ वेळा नाव कोरले आहे. व्यावसायिक फुटबॉल खेळण्याचे आणि त्यात यश मिळवण्याचे स्वप्न मी खूप अगोदर पाहिले होते. माझे या खेळावर प्रेम आहे, परंतु मला कधीच कल्पना नव्हती, की एवढ्या मोठ्या प्रमाणात या खेळामध्ये मला यश मिळेल. या खेळामुळे मला खूप काही मिळाले आहे, असे मेस्सी यावेळी म्हणाला.

Leave a Comment