मोदींचे पुणेकरांना आश्वासन, वर्षभरात पुर्ण करणार १२ किमी मेट्रो मार्गाचे काम

pune-metro
पुणे – मला महाराष्ट्रातील तसेच पुणेकर जनतेने खूप प्रेम दिले आहे. मला आशीर्वाद देण्यासाठी तुम्ही येथे जमले आहात मी यासाठी आपला आभारी असल्याचे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठी भाषेत आपल्या भावना व्यक्त करत मंगळवारी पुण्यातील मेट्रोच्या तिसऱ्या मार्गाचे भूमिपूजन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणाची मराठीतून सुरुवात करताना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आठवण काढली.

मेट्रोचा शिवाजीनगर ते हिंजवडी हा तिसरा टप्पा असून पंतप्रधानांनी त्याचे भूमिपूजन केले. पंतप्रधानांनी यावेळी बोलताना एक वर्षात पुण्यात 12 किलोमीटर मेट्रो मार्ग पूर्ण होऊन त्यावरून मेट्रो धावेल असे आश्वासन दिले. पुणे ही बाळासाहेब ठाकरे यांची जन्मभूमी आहे, माझा या शहराला प्रणाम अशा शब्दात बाळासाहेब ठाकरे यांचा गौरव केला. हिंजवडी भागातील आयटीजनांना तिसऱ्या टप्प्याच्या मेट्रोमुळे मोठा लाभ होईल. या मेट्रोमुळे आयटी इंजिनियर आनंदी झाले असल्याचे मोदी यावेळी म्हणाले.

हिंजवडी आयटी पार्क ते शिवाजीनगर हा या तिसऱ्या टप्प्याचा मार्ग असणार आहे पीएमआरडीए म्हणजेच पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून हा प्रकल्प राबवण्यात येणार आहे. हिंजवडीतील राजीव गांधी माहिती तंत्रज्ञान पार्कसह परिसरातील उद्योगांना या प्रकल्पामुळे चालणार मिळणार आहे. त्याचप्रमाणे या भागातील वाहतूक कोंडी फुटण्याच्या दृष्टीकोनातू हा मार्ग महत्वाचा ठरणार आहे.

दरम्यान कार्यक्रमस्थळी नरेंद्र मोदी यांचे आगमन झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खास पुणेरी पगडी घालून पंतप्रधानांचे स्वागत केले. मुख्यमंत्र्यांसोबत या कार्यक्रमाला राज्यपाल तसेच पुण्याचे पालकमंत्री खासदार आणि पुणे पिंपरी चिंचवडचे महापौर उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बोलताना सरकारच्या विविध योजनांचा आढावा घेत भूमिपूजन करण्यात आलेल्या तिसऱ्या टप्प्यात देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगत आयटी इंजिनिअरना ऑफिस पर्यंत जाण्यासाठी दुसऱ्या कुठल्याही वाहनाची गरज पडणार नाही अशी व्यवस्था तयार करू असे मुख्यमंत्री म्हणाले.

पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी आपल्या भाषणात चारोळी करत उपस्थितांचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला पुणे तिथे काय उणे नरेंद्रजी देवेंद्रजी तुम्ही निधी देणे आणि आम्ही विकास कामे करणे अशी चारोळी बापट यांनी आपल्या भाषणात यावेळी सादर केली.