मदतनीस कुत्र्याला सन्माननीय पदविका प्रदान

diploma
माणसाने पदवी, पदविका मिळविल्याचे आपण नेहमी ऐकतो तसे अनेकांना विद्यापीठे सन्माननिय पदव्या आणि पदविका देतात. मात्र एका कुत्र्याला अशी सन्माननिय पदविका देण्यात आल्याची घटना अमेरिकेतील घडली. ग्रिफिन नावाच्या गोल्डन रिट्रीव्हर जातीच्या सर्विस डॉगला मानद पदविका देण्याचा निर्णय पोस्टडॅम न्यूयॉर्क स्कूल बोर्ड ट्रस्टीनी घेतला आणि शनिवारी त्याला हि पदवी प्रदान केली गेली.

मिळालेल्या माहितीनुसार दिव्यांग विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी अशी प्रशिक्षित कुत्री सहाय्यक म्हणून दिली जातात. त्यांना सर्व्हिस डॉग म्हणतात.ब्रिटनी हाउले हि मुलगी ऑक्यूपेशनल थेरपीचे शिक्षण घेत असताना ग्रिफिन सतत तिच्यासोबत होता. तिचा मोबाईल शोधून देणे, दरवाजा उघडणे, लाईट लावणे, कोणतीही वस्तू दाखविली कि ती आणून देणे यासारखी सर्व कामे तो करायचाच पण ब्रिटनी जेव्हा अशक्त, अपंग लोकांवर उपचार करायची तेव्हाही तो तिला मदत करत असे. इतकेच नव्हे तर ब्रिटनीला वेदना असह्य होत तेव्हा तो तिच्या सतत सोबत असायचा. ब्रिटनी सांगते मी जे जे केले ते सर्व ग्रिफिननेही केले. माझ्या पदवी मिळविण्यात त्याचे योगदान मोठे आहे. ब्रिटनी व्हीलचेअरशिवाय चालू शकत नाही.

ब्रिटनी आणि ग्रिफिन यांनी तिच्या इंटर्नशिपच्या काळात नॉर्थ कॅरोलिना फोर्ट ब्राग मध्ये चालण्या बोलण्यात अडचण असणारे सैनिक आणि अन्य दिव्यांग यांची सेवा केली. त्यामुळे ग्रिफिनचा सन्मान करण्याचा निर्णय घेतला गेला.

Leave a Comment