नव्या वर्षात भारतात विकले जातील ३० कोटी २० लाख फोन

phones
टेक्नोलॉजीकल रिसर्च फर्म टेकआर्क ने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या अह्वलनुसार नव्या म्हणजे २०१९च्या वर्षात भारतीय बाजारात ३० कोटी २० लाख फोन विक्री अपेक्षित असून त्यात सर्वाधिक वाटा स्मार्टफोनचा असणार आहे. स्मार्टफोन विक्रीत गतवर्षाच्या तुलनेत मोठी वाढ होईल आणि हि संख्या १४.९ कोटी असेल. यातही चीनी स्मार्टफोनना अधिक मागणी येणार आहे. त्यातुलनेत ९ कोटी ८ लाख फिचर फोन आणि ५ कोटी ५० लाख स्मार्टफिचर फोन विकले जातील.

टेकआर्कचे विश्लेषक फैजल कावूसा यांच्या मते भारतात २०१९ मध्ये फोन बाजारात मोठा बदल अपेक्षित आहे. २०१५ ते २०१७ या काळात ज्या ग्राहकांनी पहिला ४ जी स्मार्टफोन घेतला ते नवीन फोन खरेदी करण्याचा विचार करतील. भारताच्या विविध भागात फोन खरेदी करण्याची मानसिकता वेगवेगळी आहे. दक्षिण आणि पश्चिम भागात ग्राहक दरवर्षी फोन बदलतात असे दिसते तर पूर्वोत्तर राज्यात ४ ते ५ वर्षे फोन वापरून बदलला जातो. उत्तर भारत दोन्हीच्या मध्ये आहे. म्हणजे येथे १ वर्षापासून ५ वर्षे फोन वापरला जातो.

नव्या वर्षात भारतीय बाजारात शाओमी, वन प्लस यांचे वर्चस्व असेल तसेच गुगल, नोकिया, आसुस, रियल मी फोनसाठी चांगली मागणी असेल. अॅपलच्या विक्रीत मात्र घट होण्याची शक्यता आहे. त्यात नवीन वर्षात ५ जी, फोल्डेबल फोनची तसेच गेमिंग फोनची क्रेझ असेल पण भारतात त्यांना लगोलग मोठा प्रतिसाद मिळण्याची शक्यता कमी आहे. गेमिंग मध्ये मिडरेंज फोन आणले जातील असाही अंदाज या अहवालात व्यक्त केला गेला आहे.

Leave a Comment