काही डॉलरच्या जेवणातून अमूल्य मोत्याची कमाई

pearl
हॉटेल मध्ये जेवण करणे हे काही फारसे कौतुकाचे राहिलेले नाही. अनेक लोक त्यांच्या आवडीचे पदार्थ पुरविणाऱ्या हॉटेल मध्ये जाऊन त्यावर आडवा हात मारतात. त्यातीलच एक रिक अँटॉश नावाची व्यक्ती. रिक ला सी फूड प्रचंड आवडते आणि न्यूयॉर्क मधील ओयस्टर बारमध्ये तो नेहमीच जातो. पण रोजचा दिवस सारखा कुठे असतो? त्याचा मजेदार अनुभव रिकला या हॉटेल मध्ये समुद्री शिंपल्याचा आस्वाद घेताना मिळाला आणि रिकच्या आयुष्यातील ते अविस्मरणीय जेवण ठरले.

moti
झाले असे, रिक त्याच्या काही मित्रांसह या हॉटेल मध्ये गेला आणि त्याने ऑयस्टरची त्याच्या पसंतीची डिश मागविली. जेवताना मध्येच त्याच्या दाताखाली खड्यासारखे काही तरी कडक आले म्हणून त्याने घास तोंडातून बाहेर काढला आणि त्याची पहिली कल्पना दाताचा तुकडा पडला अशीच झाली कारण रिकचे वय आहे ६६. पण नंतर व्यवस्थित पाहिल्यावर तो मोती असल्याचे दिसल्यावर त्याने मालकाला सांगितले. मालकालाही शिम्पेतून मोती आल्याचे मोठे नवल वाटले. रिकने हा मोती जपून ठेवला आणि बाजारात नेऊन दाखविला तेव्हा हा मोती दुर्मिळ प्रकारचा आणि २ ते ४ हजार डॉलर्स किमतीचा असल्याचे त्याला समजले.

रिक सांगतो हा मोती पांढऱ्या रंगाचा आहे आणि एकाबाजूने त्यावर काळा ठिपका आहे. हा मोती रिक विकणार नाही. त्याने या संदर्भात व्हिडीओ शेअर केला आहे.

Leave a Comment