आयपीएलमध्ये विक्रमी किंमत मिळालेल्या वरुणचा आनंद गगनात मावेना

varun
मुंबईत पार पडलेल्या आयपीएल २०१९साठी खेळाडू लिलावात किंग्स इलेव्हन पंजाबने बेस प्राईज पेक्षा तब्बल ४२ पट अधिक किंमत एका नवख्या आणि अप्रसिद्ध खेळाडूसाठी मोजली. वरून चक्रवर्ती असे त्याचे नाव असून पहिल्याच आयपीएल मध्ये मिळालेल्या या विक्रमी किमतीमुळे त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. वरुणची बेस प्राईज २० लाख रु. होती आणि याच किमतीत तरी आपल्याला कुणी खरेदी करणार का अशी शंका असलेल्या वरुणसाठी ८ कोटी ४० लाख मोजले गेले तेव्हा तो आश्चर्याने थक्क झाला.

वरुण चेन्नईतील फारसा प्रसिद्ध नसलेला खेळाडू. त्याचे वैशिष्ट म्हणजे तो सात प्रकारे स्पिन बोलिंग करू शकतो. आर्कीटेक्टचे शिक्षण घेतलेल्या वरुणने तामिळनाडू प्रीमिअर लीग आणि विजय हजारे ट्रॉफी मध्ये शानदार खेळ करून सर्वांचे लक्ष वेधले होते. मात्र पहिल्याचा आयपीएल लिलावात त्याला इतकी किंमत मिळेल अशी कुणालाच कल्पना नव्हती. वरुण मध्यमगती गोलंदाज म्हणून क्रिकेटमध्ये आला पण दुखापत झाल्याने त्याने स्पिन गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि त्याच्यासाठी हा निर्णय वरदान ठरला असे तो म्हणतो.

वरुणच्या मते त्याला हि मोठी संधी मिळाली आहे. हजारे ट्रॉफीमध्ये खेळताना त्याने २२ विकेट काढल्या होत्या. आंतरराष्ट्रीय तसेच टीम इंडियातील खेळाडूंच्या खेळ लक्षपूर्वक पाहून त्यातून बरेच शिकायला मिळाले असे सांगताना तो म्हणतो, दिग्गज खेळाडूंसोबत ड्रेसिंग रूम शेअर करायला मी फार उत्सुक आहे.

Leave a Comment