२०१८ मध्ये सर्वाधिक ५० गोल मेस्सीच्या नावावर

messi
लीयोनेल मेस्सी याने एफसी बार्सिलोना स्पॅनिश लीग ला लीग च्या १६ व्या सिझनमध्ये लेवान्तेचा पराभव करताना गोलची हॅटट्रिक केलीच पण २०१८ मध्ये सर्वाधिक ५० गोल करणारा खेळाडू म्हणून रेकॉर्ड नोंदविले. रविवारी रात्री उशिरा झालेल्या या सामन्यात आर्जेन्टिनाच्या मेस्सीने हा पराक्रम नोंदविला. या वर्षात ५० गोल करणारा तो पहिला फुटबॉलर ठरला. मेस्सीने नोंदविलेल्या ५० गोल मध्ये आंतरराष्ट्रीय तसेच क्लब सामन्यांचा समावेश आहे.

याबरोबर मेस्सीने बार्सिलोनाकडून सर्वाधिक मॅच जिंकण्याचे जावी हर्नांदेजचे रेकॉर्डहि मोडले आहे. हर्नांदेजच्या उपस्थितीत बार्सिलोनाने ३२२ सामने जिंकले आहेत तर मेस्सीच्या उपस्थितीत ३२३ सामने जिंकले आहेत.

ला लीगामध्ये लेवान्तेविरुद्ध सामना खेळताना बार्सिलोनाच्या मेस्सीने ३५, ४७ व ६० व्या मिनिटात गोलची हॅटट्रिक केली. ला लीगा स्पर्धेत बार्सिलोनाचा हा १० वा विजय आहे. एकूण १६ सामन्यात चार अनिर्णीत राहिल्या आहेत. मेसीने या स्पर्धेत यंदा १४ गोल केले आहेत.

Leave a Comment