लेनोवोचा १२ जीबी रॅमचा फेरारी सुपरफास्ट स्मार्टफोन येणार

lenovo
चीनी स्मार्टफोन उत्पादक कंपनी लेनोवोचा १२ जीबी रॅमचा स्मार्टफोन बाजारात लवकरच दाखल होणार असल्याचे समजते. या फोनचे नामकरण फेरारी सुपरफास्ट एडिशन असे केले गेले असून त्याचे काही फोटो लोक झाले आहेत. स्मॅशलिक या साईटवर हे फोटो दिसत आहेत. या फोन साठी अँड्राईड ९.० पाय ओएस दिली जाईल असा अंदाज वर्तविला जात आहे. लेनोवो त्यांच्या झेड फाइव्ह एस १८ डिसेंबरला लाँच करत आहे.

फोटो नुसार फेरारी सुपरफास्ट लेनोवो झेड फाईव्ह एसचे नवे व्हर्जन असेल. या फोनमध्येही ट्रिपल कॅमेरा सेट दिसत आहे. स्नॅपड्रगन ८४५ प्रोसेसर, १२८ जीबी इंटर्नल मेमरी, ड्युअल कलर पॅटर्न अशी त्याची अन्य फिचर असतील. हा फोन १२ जीबी रॅम सह आला तर तो सर्वाधिक जादा रॅम असलेला पहिला स्मार्टफोन ठरणार आहे. वन प्लसने नुकताच त्यांचा मॅक्लरेन एडिशन स्मार्टफोन १० जीबी रॅम सह लाँच केला आहे.

Leave a Comment