येथे जन्मली जगातील छोटुकली गाय

coww
जगातील सर्वात बूटबैगन माणूस, महिला याच्याविषयी आपल्याला ऐकून माहिती असते. अमेरिकेत आता अशी एक छोटी गाय जन्माला आली असून या पिल्लाचे वजन फक्त साडेचार किलो आहे. सर्वसामान्य पिलाचे वजन जन्मावेळी साधारण ३० ते चाळीस किलो असते. या छोटुकल्या गाईचे नामकरण लीलो बिल असे केले गेले आहे. गाईच्या मालकाने हे पिलू जन्माला येताच ते आजारी असावे म्हणून मिसिसिपीच्या व्हेटर्नरी मेडिसिन विद्यापीठात नेले तेव्हा तपासणी नंतर हे पिलू एकदम स्वस्थ असल्याचे डॉक्टरानी सांगितले.

या अजब पिलाचे फोटो सोशल मिडीयावर व्हायरल झाल्यावर त्याला पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली. अर्थात डॉक्टर हे पिलू इतके छोटे का जन्मले याचा शोध घेत आहेतच. विशेष म्हणजे या पिलाच्या नावाचा हॅशटॅग बनला आहे. अनेकांनी या पिलाचे वेगळे पेज बनवा ज्यामुळे आम्हाला त्याच्या तब्येतीची माहिती मिळत राहील अशीही विनंती केली आहे.

जगातील सर्वात लहान गाईचे गिनीज रेकोर्ड सध्या केरळ मधील अथाहोली गावातील मनिकायम या गाईच्या नावावर असून ती सहा वर्षाची आहे. तिची उंची पावणेदोन फुट आणि वजन ४० किलो आहे. सर्वसाधारण गाईची उंची साडेचार ते पाच फुट असते आणि वजन ३१३ किलो पर्यंत असते. आता लिलो बिल सर्वात छोट्या गाईचे रेकॉर्ड नोंदविणार का हे लवकरच स्पष्ट होईल.

Leave a Comment