या गावात कुठेही आणि कधीही डाराडूर झोपतात लोक

sleep
आयुष्य वेगवान आणि स्पर्धेचे बनल्याने जगभरातील लोकांना शांत झोप न येण्याची समस्या भेडसावते आहे. रात्रीच्या रात्री गादीवर तळमळत काढाव्या लागतात. अश्यावेळी काझाकिस्तानातील एका गावात लोक कुठेही, कधीही आणि कितीही वेळ डाराडूर झोपतात असे सांगितले तर कुणाचा विश्वास बसणार नाही. मात्र हि गोष्ट अगदी सत्य आहे. या गावाचे नाव आहे कलाची.

या गावात लोक खातापिताना, काम करताना, वाहन चालविताना, बोलताना कधीही आणि कुठेही म्हणजे अगदी रस्त्यात, फुटपाथवर, बाजारात एकाएकी डाराडूर झोपतात. त्यांच्या या रहस्यमय झोपेचे काय कारण असावे याचा शोध अनेक संशोधक, डॉक्टर्स घेत आहेत मात्र हे कारण अद्याप सापडलेले नाही. झोपी गेलेले लोक कधी जागे होतील याची नक्की वेळ नाही. तसेच अनेकदा झोपेतून उठल्यावर काही जण स्वतःची ओळख विसरतात. त्यांना मागचे काहीच आठवत नाही.

kalachi
एकाएकी झोपी जाणारयात लहान मुलांपासून ते म्हाताऱ्या लोकांपर्यंत सर्वांचा समावेश आहे. वैज्ञानिक या गाढ झोपेमागाचे कारण शोधू शकले नसले तरी स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार या गावाजवळ असलेल्या युरेनियमच्या खाणी त्यासाठी कारणीभूत आहेत. या खाणीतून निघणारा वायू माणसाच्या शरीरावर परिणाम करून त्याला बेशुद्ध करू शकतो. याला स्लीपिंग डिसऑर्डर म्हटले जाते. या झोपेच्या त्रासामुळे गेल्या ३-४ वर्षात अनेक नागरिकांनी या गावातून स्थलांतर केले आहे असेहि समजते.

Leave a Comment