गुगल सर्चमध्ये इडियट ट्रम्प नंतर आता भिकारी इम्रानखान

bhikari
गुगल सर्च इंजिन जगातील सर्वात उत्तम सर्च इंजिन असल्याचे अॅपलचे सीईओ टीम कुक याने मान्य केले आहेच. जगातील कोट्यावधी युजर या इंजिनचा उपयोग करत आहेत. तेथे भिकारी असे सर्च केले तर सर्वप्रथम पाकिस्तानचे पंतप्रधान आणि माजी क्रिकेटपटू इमरानखान याचे नाव आणि फोटो येत असल्याचे दिसून आले आहे. काही दिवसापूर्वी इडियट असा सर्च दिला कि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव आणि माहिती झळकत असे त्यात आता भिकारी मध्ये इम्रानखान यांच्या नावाची आणि माहितीची भर पडली आहे.

या प्रकारामुळे इम्रानखान यांना संताप अनावर झाला असून त्यांनी गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांना नोटीस पाठविण्याची तयारी केली आहे. तसा प्रस्ताव पाकच्या पंजाब विधानसभेत सादर केला गेला आहे. त्यानुसार पिचाई यांना समन्स पाठविले जाणार आहे. हा प्रस्ताव एका पत्रकाराने सोशल मिडीयावर शेअर केला आहे.

इडियट सर्च केल्यावर गुगल ट्रम्प यांचा फोटो आणि माहिती का दाखविते याचे स्पष्टीकरण देताना सीइओ सुंदर पिचाई म्हणाले होते, त्यात गुगलचा कोणताही हस्तक्षेप नसतो. कुणाचीही प्रतिमा मलीन करण्याचा गुगलचा हेतू नाही. तंत्रज्ञानामुळे हे घडते. गुगल सर्चवर जेव्हा की वर्ड टाकला जातो तेव्हा एल्गोरिदमच्या आधारावर वेबपेज व फोटो शोधला जातो. एखादा शब्द वारंवार सर्च केला जात असेल तर सर्च इंजिन तो की वर्ड लोकप्रिय श्रेणीत सामील करते. इडियट शब्द सर्च केल्यावर ट्रम्प याचा फोटो आणि माहिती दिसत होती कारण बेबीस्पिटल ब्लॉग साईटवर ट्रम्प याच्या फोटोवर वारंवार इडियट असे लिहिले गेले होते आणि या साईटवर ट्रम्प यांच्या विरोधात अनेक ब्लॉग लिहिले गेले होते.

आता इम्रान खान याच्या बाबत काय स्पष्टीकरण सुंदर पिचाई देणार याची अनेकांना उत्सुकता लागली आहे.
—————-

Leave a Comment