आता जहाजातूनही प्रवास करताना मिळणार इंटरनेट सुविधा

ship
नवी दिल्ली – अनेकांना विमान अथवा जहाजातून प्रवास दरम्यान मोबाईल कॉलिंग अथवा इंटरनेटच्या सुविधेला मुकावे लागते. आता लवकरच विमान अथवा जहाजातून प्रवास करणाऱ्यांना ही सुविधा मिळणार आहे. केंद्र सरकार लवकरच याबाबत निर्देश काढणार आहे.

ग्राहकांना भारतीय एअरलाईन्स आणि विदेशी एअरलाईन्स कंपन्यासह जहाज कंपन्यांना इंटरनेट आणि कॉलिंगची सेवा देता येणार आहे. या नव्या नियमाचे नाव फ्लाईट आणि मॅरिटाईम कनेक्टिव्हिटी २०१८ असे असून केंद्र सरकारने डिसेंबर १४ मध्ये याबाबतचे निर्देश काढले आहेत.

लवकरच अध्यादेश प्रसिद्ध होताच हे नियम लागू होणार आहेत. टेलिकॉम नेटवर्क आणि सॅटेलाईटचा वापर विमानात आणि जहाजात (आयएफएमसी) करता येणार आहे. पण मोबाईल कंपन्यातील टेलिकॉम ऑपरेटर हे केवळ देशातील असणे आवश्यक आहे. तर सॅटेलाईटने इंटरनेट देणाऱ्या विदेशी उपग्रहांना अंतराळ विभागाची परवानगी असणे गरजेचे आहे. विमान प्रवाशांना आयएफएमसीची सेवा विमान हे ३ हजार मीटर उंचीवर गेल्यानंतर मिळू शकणार आहे.

Leave a Comment