बाबा रामदेव यांचा चीनच्या कंपनीशी करार

ramdev-baba
भारतात आयुर्वेद उत्पादनांच्या क्षेत्रात दिग्गज बनलेल्या बाबा रामदेव यांच्या पतंजलिने चीनच्या एका कंपनीशी करार करण्याचा निर्णय घेतला आहे. आयुर्वेदाच्या क्षेत्रात संशोधनाला वाव देण्यासाठी हा करार करण्यात आला आहे.

बाबा रामदेव यांच्या पतंजलि आयुर्वेद लिमिटेड आणि चीनमधील अॅडमिनिस्ट्रेटिव्ह कमेटी ऑफ नबडागंग इंडस्ट्रियल पार्क या कंपनीने या एमओयूवर स्वाक्षरी केली आहे. या करारावर स्वाक्षऱ्या चीनमध्येच करण्यात आल्या आहेत. याबाबत बाबा रामदेव यांचे सहकारी आणि पतंजलि आयुर्वेदचे अध्यक्ष बालकृष्ण यांनी आपल्या फेसबुक पेजवर माहिती दिली आहे.

बालकृष्ण यांनी फेसबुकवर शनिवारी स्वाक्षरी झालेला एमओयू शेअर केला. “भारतवर्ष आणि भारतीय संस्कृतीच्या दृष्टीने गौरवाचा क्षण” असे त्यांनी याचे वर्णन केले आहे.

भारताप्रमाणेच चीनची संस्कृतीही अत्यंत प्राचीन आणि समृद्ध आहे. त्यामुळे दोन्ही देशांनी एकत्र येऊन आयुर्वेद आणि विज्ञानात संशोधन करणे चांगले आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

या करारांतर्गत नबडागंगच्या सरकारने भारतातील कला, संस्कृती, परंपरा, योग, आयुर्वेद संशोधन, योग- केंद्र , पर्यटन, माहिती तंत्रज्ञान, शिक्षण आणि माध्यम इत्यादी कार्ये करण्यास मान्यता दिली तसेच त्यासाठी सर्व स्रोत उपलब्ध करून देण्यास आश्वासन दिले, अशी माहिती बालकृष्ण यांनी दिली आहे. मात्र या करारत नेपाळमधील सीएम ग्रुप, चायनीच कल्चरल प्रोमोशन सोसायटी आणि मलेशियातील एक कंपनी यांचाही समावेश आहे.

Leave a Comment