लॉटरी जिंकल्याने नाही तर या कृतीमुळे झाला हिरो

krushana
भगवान देता है तो छप्पर फाडके देता है अशी एक म्हण आपल्याकडे आहे. म्हणजे देवाने दिले तर घराचे छप्पर फाटेल इतके मिळते याचा अनुभव फ्लोरिडा मध्ये राहणाऱ्या एका भारतीयाने घेतला. कृष्णा नावाच्या या व्यक्तीने आयुष्यात प्रथम लॉटरी काढली आणि त्याला चक्क १४.५ दशलक्ष डॉलर्स म्हणजे १०४ कोटी ४० लाख रुपयांची लॉटरी लागली आणि तो एकदम हिरो बनला. पण त्यानंतर त्याने केलेल्या कृतीने तो सुपरहिरो बनला आहे.

कृष्णा सांगतो, फ्लोरिडा मध्ये मी प्रथमच लॉटरी काढली आणि १ डिसेम्बरला झालेल्या सोडतीत त्याला १४.५ दशलक्ष डॉलर्स मिळाले. या संदर्भात फॅक्स न्यूजवर बोलताना तो म्हणाला, लॉटरी मधील ते नंबर मी विसरू शकत नाही. अचानक हा खजिना मला गवसला आणि पत्नीला फोन करून मी हि बातमी सांगितली. २० वर्षापूर्वी एका नातेवाईकांच्या मदतीने कृष्ण शिकण्यासाठी अमेरिकेत आले. पण लवकरच या नातेवाईकांचे निधन झाल्याने प्रचंड कष्ट करून, विविध नोकर्या करून त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. लॉटरीतून मिळालेल्या पैशातून त्यांनी या नातेवाईकांच्या नावाने ट्रस्ट स्थापन करण्याचा आणि त्या माध्यमातून १०० हून अधिक अपंग भारतीय मुलांचे शिक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे.

या साठी या महिन्यात ते भारतात येत आहेत. कृष्ण म्हणाले लॉटरी बक्षिसाच्या रकमेतून मी कुतुमाबाशी एक घर, गाडी घेणार आहे आणि मुलांच्या भविष्याची काही तरतूद करणार आहे. बाकी रक्कम अपंग मुलांच्या शिक्षणासाठी खर्च करणार आहे.

Leave a Comment