मोसुओ आदिवासी समाजामध्ये कुटुंबावर पुरुषांची नाही, तर महिलांची सत्ता चालते.

tirbal
वेगवेगळ्या प्रकारच्या आदिवासी जमाती जगभरात राहतात आणि तेवढेच विचित्र त्यांचे रीतिरिवाजही आहेत. चीनच्या युनान आणि सिचुआन प्रांतांत राहणारी मोसुओ जमातही यापैकीच एक आहे. या आदिवासी समाजामध्ये लग्न करण्याचा कोणताही रिवाज नाही. आपल्या मर्जीने तरुण-तरुणी पार्टनर निवडतात, पण ना त्यांच्यात लग्न होते, ना मुलगी मुलाच्या घरी नांदायला जाते. एका दिवसासाठी हे संबंध ठेवले जातात किंवा दीर्घकाळही असू शकतात. दोघे मिळून ते सर्वस्वी ठरवतात. पण प्रत्येक रात्र मुलांना मुलीच्या घरी घालवावी लागते.
tirbal1
याबाबत चायना डेलीने दिलेल्या वृत्तानुसार, या जमातीमध्ये मुलीचे वय १३ वर्षे झाल्यानंतर ती आपला पार्टनर निवडू शकते. मुलीप्रमाणेच पार्टनर निवडण्याचा अधिकार मुलांनाही असतो, पण हे सर्व काही मुलीच्या सहमतीनेच होते. ज्याला मुलगी अथवा मुलाने पसंत केले तो तिला चारकोल, मिरची आणि चिकनच्या पंखांनी भरलेले एक पाकिट गिफ्ट म्हणून पहिल्या प्रेमाची कबुली देतो. मग मुलगी अथवा मुलाच्या राजीखुशीने संबंधांशी सुरुवात होते. तथापि, संबंध सुरू करण्याआधी हे आवश्यक असते की, मुलगा-मुलगी दोघेही मोसुओ जमातीचेच असावेत.
tirbal2
मुलगा आणि मुलगी संबंध सुरू केल्यानंतरही दोघेही आपापल्या घरीच राहतात. प्रत्येक रात्र फक्त मुलगा मुलीच्या घरात काढतो आणि सकाळी आपल्या घरी निघून जातो. मुलगा अथवा मुलीची मर्जी जोपर्यंत असते, दोघेही तोपर्यंत सोबत वेळ घालवतात आणि ज्या दिवशी दोघांपैकी एकालाही हे संबंध संपवायचे असतील, ते एकमेकांना सांगून संबंध संपुष्टात आणतात. यानंतर दोघेही आपल्या नव्या पार्टनरचा शोध घेऊ लागतात. याला वॉकिंग मॅरिज नावानेच ओळखले जाते.
tirbal3
मोसुओ आदिवासी जमातीमध्ये कुटुंबावर पुरुषांची नाही, तर महिलांची सत्ता चालते. घरातील सर्व महत्त्वाचे निर्णय महिलाच घेतात. या जमातीत पुरुषांचे काम मासेमारी करणे, जनावरांचे पालन करणे असे असते. त्यांना अक्सियास म्हटले जाते. येथे लोकांना त्यांच्या वडिलांच्या नावाने नाही, तर आईच्या नावाने ओळखले जाते.

Leave a Comment