रानडुकरामुळे रंकाचा बनला राजा

dukkar
नशिबाचे कुलूप उघडले तर रंकाचा राजा बनायला वेळ लागत नाही असे म्हणतात. चीन मधील एका गावात हा चमत्कार घडला आहे. या गावातील चून ने नावाचा एक गरीब माणूस जंगलात गेला आणि त्याने तेथे रानडुकराची शिकार केली. शिकार घेउन घरी येऊन त्याने ते डुक्कर कापले तेव्हा डुकराच्या पोटातून त्याला विचित्र दिसणारी व त्याने कधीच न पाहिलेली एक दगडासारखी वस्तू दिसली. चून याने हि वस्तू तशीच ठेवली आणि हे नक्की काय आहे ते जाणून घेण्यासाठी तो शांघायला गेला.

तेथे काही तज्ञांना त्याने हि वस्तू दाखविली तेव्हा त्यांनी हि वस्तू जगातील काही मौल्यवान चीजांपैकी एक असल्याचे त्याला सांगितले. ४ इंच लांब आणि अडीच इंच रुंदीची हि वस्तू म्हणजे डुक्कर आणि त्यासारख्या प्राण्यांच्या पोटात आपोआप तयार होणारा एक प्रकारच खडा असून त्याची बाजारातील किंमत चार लाख ५० हजार पौंड म्हणजे ४ कोटी रु. होईल असा अंदाज वर्तविला.

चूनने बेजोर असे नाव असलेल्या या वस्तूचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला आणि ४ कोटी रु. मिळविले. या बेजोरचा वापर अनेक औषधात केला जातो तसेच अनेक प्रकारचे विष उतरविण्यासाठी या बेजोर पासून बनविलेली इंजेक्शन दिली जातात. हा बेजोर अतिदुर्मिळ असल्याने त्याची किंमत अधिक असते.

Leave a Comment