बीएमडब्ल्यू वर्ल्ड टूरनामेंट मध्ये अखेर पीवी सिंधूने लुटले सोने

sindhu
भारताची स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू हिने अखेर महत्वाच्या स्पर्धात अंतिम फेरीत पराभूत होण्याचा सिलसिला मोडून काढत रविवारी झालेल्या बीएमडब्ल्यू वर्ल्ड टूरनामेंट मध्ये जागतिक अजिंक्यपद मिळवून सोन्याची लुट केली. हि स्पर्धा जिंकणारी ती पहिलीच भारतीय बॅडमिंटनपटू ठरलीच पण तिचाही हा पहिलाच खिताब आहे.

रविवारी झालेल्या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात सिंधूने जपानच्या निजोमी ओकुहारावर २१-१९ आणि २१-१७ अशी सरळ दोन सेट मध्ये मात करून सुवर्णपदकावर हक्क सांगितला. गतवर्षी सिंधूला याच स्पर्धेत अंतिम फेरीत निजोमीकडून परभव पत्कारावा लागला होता त्याचा वचपा सिंधूने या वर्षी काढला. सिंधूने या अंतिम फेरीत एकही चूक न करता निर्दोष खेळ करून या विजेतेपदाला गवसणी घातली. रिओ ऑलिम्पिक पासून सिंधू आत्तापर्यंत सात वेळा विविध स्पर्धांच्या अंतिम फेरीत पोहोचली आहे पण तिला प्रथमच सुवर्णपदक जिंकता आले आहे.

Leave a Comment