गुगल शॉपिंग साईटचा मदतीने करा मस्त शॉपिंग

shopping
गुगलने जगभर त्यांचे अनेक डिजिटल प्लॅटफॉर्म सुरु करून युजरना इंटरनेटच्या माध्यमातून अनेक प्रकारच्या सेवा आणि सर्च उपलब्ध करून दिले आहेतच. त्यात आता भारतात ऑनलाईन शॉपिंग अधिक सुलभतेने आणि रास्त दरात करता यावे म्हणून गुगल शॉपिंग साईट लाँच केली आहे. यामुळे गुगलने या क्षेत्रात आता फ्लिपकार्ट, अमेझोन, पेटीएम यांना इ कॉमर्स क्षेत्रात आव्हान दिले आहे.

गुगलचे उपाध्यक्ष (उत्पादन व्यवस्थापन) सुरोजित चटर्जी म्हणाले यामुळे युजरना नवीन शॉपिंग सर्च अनुभव घेता येणार आहे. ग्राहकाला सहजतेने कोणत्याही उत्पादनावर कोणत्या ऑनलाईन साईटवर काय ऑफर्स आहेत ते सोर्टआउट करता येणार आहे. त्यामुळे तो स्वतः निवड करून त्याच्यासाठीचे योग्य उत्पादन निवडू शकणार आहे.

गुगल शॉपिंगच्या मदतीने युजर मल्टीपल ई कॉमर्स साईटवर दिल्या जात असलेल्या ऑफर्स एकत्र पाहू शकेल त्यात रिटेलर्सचाही समावेश असेल. यामुळे युजर फ्रेंडली शॉपिंग म्हणजे काय याचा अनुभव ग्राहकाला मिळेल. मोबाईल फोन, स्पीकर्स, महिला कपडे, पुस्तके, घड्याळे, होम डेकॉर, पर्सनल केअर अश्या विविध कॅटेगरि त्यासाठी केल्या गेल्या आहेत.

Leave a Comment