फेसबुकचा आणखी एक घोळ – नवीन बगचा 60 लाख वापरकर्त्यांना फटका

facebook
जगप्रसिद्ध सोशल मीडिया नेटवर्क फेसबुकच्या 60 लाख वापरकर्त्यांची खासगी छायाचित्रे थर्ड-पार्टी अॅप्सपर्यंत धोका आहे, अशी कबुली कंपनीने दिली आहे. त्यामुळे डाटा लीकनंतर फेसबुकचा आणखी एक घोळ समोर आला आहे.

कंपनीने शुक्रवारी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे, की 876 विकासकांनी बनविलेल्या 1,500 पेक्षा जास्त अॅप्सवरही या बगचा परिणाम झाला असण्याची शक्यता आहे. या वर्षी 13 सप्टेंबर ते 25 सप्टेंबर दरम्यान 12 दिवसांच्या कालावधीत वापरकर्त्यांनी शेअर न केलेली छायाचित्रेही या बगमुळे प्रभावित झाली आहेत, असे सीएनएन वाहिनीने म्हटले आहे.

“या बगवर तोडगा काढण्यात आला आहे. आणि डेव्हलपर्ससाठी पुढील आठवड्यात साधने उपलब्ध करून देण्यात येतील. त्याद्वारे ते त्यांचे कोणते वापरकर्ते या बगने प्रभावित झाले आहेत, हे ठरवू शकतील,” असेही फेसबुकने म्हटले आहे.

फेसबुक आपल्या वापरकर्त्यांना त्यांच्या खाजगी फोटोंच्या संभाव्य प्रदर्शनाविषयी कळविल आणि प्रभावित वापरकर्त्यांच्या छायाचित्रांच्या प्रती हटविण्यासाठी डेव्हलपर्ससोबत फेसबुक काम करेल, असेही कंपनीने म्हटले आहे.

फेसबुक हे जगातील सर्वात मोठे सोशल मीडिया नेटवर्क असून गेले एख वर्ष ते वापरकर्त्यांच्या माहितीचा दुरुपयोग केल्याबद्दल वादात आहे. फेसबुकच्या 5 कोटी वापरकर्त्यांचे खाते हॅकरद्वारे नियंत्रित केले जाऊ शकते, असे गेल्या महिन्यात कंपनीने जाहीर केले होते. फेसबुकचा सीईओ मार्क जुकरबर्ग याने हे अत्यंत गंभीर असल्याचे सांगितले होते.

Leave a Comment