व्होडाफोनने आणला १६९ रुपयांचा नवा प्लान

vodafone
मुंबई : व्होडाफोनने रिलायन्स जिओच्या १४९ रुपयांच्या प्लानला टक्कर देण्यासाठी नवा प्लान लाँच केला आहे. व्होडाफोनच्या या प्रीपेड पॅकची किंमत फक्त १६९ रुपये आहे. यामध्ये अनलिमिटेड कॉल, डेटा सारख्या ऑफर्स मिळणार आहे.

व्होडाफोनच्या नव्या प्रीपेड पॅकमध्ये अनलिमिटेड लोकल आणि नॅशनल कॉलिंग, मोफत रोमिंग, १ जीबी 3जी/4जी डेटा दरदिवशी दिला जाणार आहे. यासोबतच १०० एसएमएस प्रतिदिवस अशी सुविधा यामध्ये आहे. व्होडाफोनच्या या रिचार्जची सुविधा २८ दिवसांकरिता आहे. जिओच्या १४९ रुपये प्लानमध्ये अनलिमिटेड कॉलिंगसोबत १.५ जीबी ४ जी डेटा प्रत्येक दिवशी म्हणून एकूण ४२ जीबी डेटा तसेच १०० एसएमएस प्रत्येक दिवशी ऑफर केले आहे. या पॅकची वैधता ही २८ दिवसांची आहे.

अनलिमिटेड कॉलसोबत व्होडाफोनने काही लिमिट देखील ठेवण्यात आली असते. व्होडाफोनच्या पॅकमध्ये २५० मिनिट प्रत्येक दिवशी आणि १ हजार मिनिट प्रत्येक आठवड्याची लिमिट आहे. ही लिमिट संपल्यानंतर युझरकडून १.२ पैसा प्रति सेकंद किंवा १ रुपये प्रति मिनिट या हिशेबाने पैसे आकारले जातील. पण जिओच्या प्रत्येक रिचार्ज पॅकवर जिओ अॅप्स सूटचा मोफत ऐक्सेस मिळतो.