गुगलची किरकोळ विक्रेत्यांसाठी ‘ही’ खास मोफत सुविधा

google
नवी दिल्ली – सध्याच्या घडीला ऑनलाईन शॉपिंगचा ट्रेंड वाढत असताना व्यवसाय कसा करावा, ही समस्या उभी किरकोळ विक्रेत्यांसमोर ठाकली आहे. गुगलने अशा स्थितीत एक खास सुविधा आणली आहे. किरकोळ विक्रेत्यांना ‘गुगल शॉपिंग’च्या माध्यमातून ऑनलाईन वस्तू विक्री करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. ग्राहकांनाही वस्तू खरेदी करताना विविध विक्रेत्यांच्या किमती आणि ऑफर पाहता येणार आहे.

गुगल शॉपिंगमध्ये शॉपिंग होम पेज, शॉपिंग टॅब हे पर्याय उपलब्ध असणार आहेत. ट्रेडिंगमधील उत्पादने, त्यावरील सवलती एकाचवेळी ग्राहकांना पाहता येणार आहे. मर्चंट सेंटर हा हिंदीमध्ये पर्याय किरकोळ विक्रेत्यांसाठी असणार आहे. विक्रेत्यांना यातून त्यांची उत्पादने विक्रीसाठी कोणत्याही शुल्काविना ठेवता येणार आहे.

देशात सध्याच्या घडीला ४० कोटी इंटरनेटचे वापरकर्ते आहेत. त्यापैकी एक तृतीयांश हे ऑनलाईन खरेदी करतात. नव्या गुगल शॉपिंगमुळे पहिल्यांदा स्मार्टफोन अथवा कॉम्प्युटरमधून खरेदी करणाऱ्यांची संख्या वाढेल, अशी अपेक्षा गुगलचे उपाध्यक्ष सुरोजित चटर्जी (उत्पादन व्यवस्थापन) यांनी व्यक्त केली.

किरकोळ विक्रेते आणि ग्राहक गुगल शॉपिंगमुळे जोडले जाणार आहेत. आर्थिक व्यवहार करणे आणि ग्राहकांना वस्तू घर पोहोच करण्याची संधी विक्रेत्यांना मिळणार आहे. देशात ५.८ कोटी लघु आणि मध्यम व्यवसाय आहेत. त्यापैकी ३५ टक्के उद्योग हे किरकोळ विक्री करणारे आहेत. मात्र ऑनलाईन असणाऱ्या लघु आणि मध्यम व्यवसायांचे प्रमाण अत्यल्प आहे. त्यामुळे गुगल शॉपिंगद्वारा व्यावसायिकांना कोट्यवधी ग्राहकांपर्यंत पोहचण्याची संधी मिळणार आहे.

शॉपिंग साईटपर्यंत किरकोळ बाजारपेठेला पोहोचविणे आणि मोठ्या विक्रेत्यांना लहान दुकानापर्यंत पोहोचविणे हेदेखील गुगल शॉपिंगचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी ऑनलाईन साधने, तंत्रज्ञान उपलब्ध करुन दिले जाणार असल्याचे चटर्जी यांनी सांगितले.

Leave a Comment