पीएफमधून नोकरदार आता काढू शकतात एवढे पैसे! - Majha Paper

पीएफमधून नोकरदार आता काढू शकतात एवढे पैसे!

EPFO
कर्मचारी भविष्य निधी अर्थात ईपीएफओ हा निवृत्त झाल्यानंतर मोठा आधार असतो. तुम्हाला नोकरीवरुन काढल्यानंतर अथवा नोकरी गेल्यानंतर ईपीएफओ खात्यातून तुम्ही आता ७५ टक्के एका महिन्यात काढू शकतात. हा नियम ६ डिसेंबरपासून लागू झाला आहे. सध्याच्या नियमानुसार तुम्ही दोन महिन्यानंतरही रक्कम काढू शकता. गंभीर आजाराच्या खर्चासाठी, मुलांचे शिक्षण, घर खरेदी आणि लग्नासाठी पैसे काढता येतात. हा नियम राज्य आणि केंद्रीय कर्मचाऱ्यांनाही लागू आहे.

नुकतीच एक महत्त्वाची बैठक ईपीएफओची पार पडली. कामगार मंत्री संतोष कुमार गंगवार यांनी सांगितले की, तुमची जर नोकरी गेली आणि तुम्ही बेरोजगार झाला तर एका महिन्यात तुम्हाला ७५ टक्के रक्कम काढण्यासाठी मुभा दिली आहे.यापूर्वी नोकरी सोडल्यानंतर ५८ वर्षांपर्यंत पीएफ काढता येणार नाही असा नियम होता आणि १ मे २०१६ पासून लागू होणार होता. या निर्णयाला त्यानंतर कर्मचाऱ्यांनी कडाडून विरोध केला त्यानंतर हा निर्णय मागे घेण्यात आला.

Leave a Comment