पोस्ट खात्याने ई-कॉमर्स सेवेसाठी सुरू केले पोर्टल

indian-post
नवी दिल्ली – पोस्ट विभागाने बँकिंग क्षेत्रात प्रवेश केल्यानंतर आपल्या सेवा विस्तारल्या असून पोस्ट विभागाने आता ई-कॉमर्स कंपन्यांना त्यांची उत्पादने ग्राहकापर्यंत घरपोच पोहोचविण्यासाठी नवे पोर्टल सुरू केले आहे. दूरसंचार मंत्री मनोज सिन्हा यांनी या पोर्टलचे उद्घाटन केले.

इंडिया पोस्टने पार्सल सेवेचा अधिकाधिक लाभ मिळवून देण्यासाठी ई-कॉमर्स सेवेला सुरुवात केली आहे. या सेवेतून पोस्ट कार्यालयात पार्सल सुविधेतील त्रूटी कमी करण्यात आल्यामुळे पार्सलचे दर ठरवून ते लवकरात लवकर पाठविणे शक्य होणार आहे. ई-कॉमर्स सेवेसाठी घरपोच उत्पादने पोहोचविण्याकरिता पोस्टाच्या नेटवर्कचा फायदा होणार असल्याची माहिती दूरसंचार मंत्री मनोज सिन्हा यांनी माध्यमांना दिली.

खासगी कंपन्यांना यापूर्वी देण्यात येणारी पार्सल सेवा ही वेळखाऊ होती. यासाठी पार्सल संचालनालयाची स्थापना पोस्ट कार्यालय विभागाने केली आहे. ई-कॉमर्स व्यावसायिकांना यातून इंडिया पोस्टमध्ये नोंदणी करता येणार आहे. पोस्ट खात्याची ग्रामीण भागात १.५५ लाख कार्यालये आहेत. अनेक वर्ष पोस्ट विभागाने विश्वासहर्ता दाखवून दिली आहे. जेव्हा तक्रारी येतील, तेंव्हा आम्ही त्या सोडवू, असेही त्यांनी सांगितले.

Leave a Comment