येतेय टोयोटाची सुप्रा स्पोर्ट्स कार

supra
जपानची जगप्रसिद्ध ऑटो कंपनी टोयोटाची वाहने खूपच लोकप्रिय आहेत. पूर्वी या कंपनीची प्रसिद्धी स्पोर्ट्स कार बनविणारी कंपनी अशी होती मात्र २००२ पासून कंपनीने स्पोर्ट्स कारचे उत्पादन बंद केले होते. सुमारे १६ वर्षानंतर पुन्हा एकदा टोयोटा स्पोर्ट्स कार सेग्मेंट मध्ये एन्ट्री करत असून टोयोटा आणि बीएमडब्ल्यू यांनी संयुक्तपणे तयार केलेली सुप्रा स्पोर्ट्स कार २०१९ च्या डेट्रोइट मोटर शो मध्ये सादर केली जात आहे.

कंपनीकडून हि स्पोर्ट्स कार फेरारीला मात देईल असा दावा केला जात आहे. गेली ६ वर्षे हि कार तयार केली जात असून तिचा फ्रंट एंड फोटो नुकताच लिक झाला आहे. सुप्रा दिसण्यात एफटी वन सारखी वाटते आहे. तिलाही डबल रुफ दिले गेले असून इंटिरियर बीएमडब्ल्यू झेड ४ प्रमाणे आहे. या कारला चार व सहा सिलिंडर टर्बोचार्ज्ड इंजिन दिले जाईल असे समजते.

Leave a Comment