अंतराळ पर्यटनाचे स्वप्न प्रत्यक्षात येणार

virgin
स्पेस फ्लाईट कंपनी व्हर्जिन गॅलॅस्टिकने विकसित केलेल्या टुरिझम स्पेसशिप या व्यावसायिक स्पेसक्राफ्टने गुरुवारी कॅलीफोर्नियाच्या मोझेव वाळवंटातून प्रथमच ८० किमी वर प्रवास करून परत पृथ्वीवर यशस्वी लँडिंग करण्यात यश मिळविले आहे. त्यामुळे व्यावसायिक स्पेस पर्यटनाचे स्वप्न प्रत्यक्षात येणे आता शक्य झाले आहे.

व्हर्जिन गॅलॅस्टिकचे ग्राहक अंतराळात जेटसाईझच्या रॉकेटमधून प्रवास करू शकतील आणि एकावेळी ६ प्रवासी हा आनंद लुटू शकतील असे कंपनीचे संस्थापक रिचर्ड ब्रंस यांनी जाहीर केले आहे. अर्थात सर्वप्रथम या प्रवासावर जाण्याची रिचर्ड यांची मनीषा आहे. या कंपनीने पहिले स्पेस क्राफ्ट २०१४ साली बनवून त्याची चाचणी घेतली तेव्हा टेस्ट फ्लाईटमध्ये ते कोसळले आणि को पायलटचा त्यात मृत्यू झाला होता. तरीही सुमारे ६०० जननी २ लाख ५० हजार डॉलर्स भरून या प्रवासासाठी नोंदणी केली आहे असे समजते.

या प्रवासात पर्यटक अंतराळात ८२ किमी जाऊन तेथून पृथ्वी पाहू शकणार आहे तसेच काही मिनिटे वजनरहित अवस्थेचा अनुभव घेऊ शकणार आहे.

Leave a Comment