१ वर्ष मोबाईल सोडा आणि जिंका ७१ लाख रुपये

vitamin
लहान थोरांना सध्या मोबाईलचे जणू व्यसन लागले आहे. दिवसाचा एखादा तास मोबाईलशिवाय काढणे जेथे अश्यक्य बनते आहे तेथे वर्षभर मोबाईलला हातही न लावणे कसे शक्य होणार? पण त्यासाठी समजा भलीमोठी रक्कम मिळणार असेल तर? मग अश्या लोकांना वर्षभर मोबाईलचा त्याग केला तर चक्क १ लाख डॉलर्स म्हणजे ७१ लाख रुपये मिळविण्याची संधी कोका कोलाची मालकी असलेल्या व्हिटॅमीनवॉटर ब्रांडने दिली आहे.

व्हिटॅमीनवॉटरने यासाठी एक स्पर्धा आयोजित केली आहे. त्यात भाग घेणाऱ्यानी वर्षभर मोबाईलला हात लावायचा नाही. तुम्ही खरोखर हि अट पाळली आहे का याची परीक्षा लाय डीक्टेटर टेस्ट घेऊन केली जाणार आहे. अर्थात या स्पर्धेत सामील होण्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्रामच्या माध्यमातून # नो फोन फॉर इअर, # कॉन्टेस्ट वर अर्ज करता येतील. त्यात निवडल्या गेलेल्या स्पर्धकांना फोन वापरणार नाही याचा करार करावा लागेल. तसेच स्मार्टफोन का वापरणार नाही आणि रिकामा वेळ कसा घालविणार याचे स्पष्टीकरण द्यावे लागेल. हे अर्ज ८ जानेवारी २०१९ पूर्वी करायचे आहेत.

निवड झालेल्या स्पर्धकांना १ वर्षाच्या सेल्युलर प्लान सोबत १९९६ च्या वेळचा सेल्युलर टेलिफोन दिला जाणार आहे. या काळात स्पर्धक लॅपटॉप, डेस्कटॉप वापरू शकणार आहेत. टचस्क्रीन असलेला फोन न वापरता सहा महिने राहिल्यासही स्पर्धक १ लाख डॉलर जिंकू शकणार आहे.