भारताची फुलराणी साईना नेहवाल आणि बॅडमिंटनपटू परुपली कश्यप यांनी अत्यंत साधेपणाने विवाह केला असून त्याचे फोटो ट्विटर आणि इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. साईनाने या फोटोखाली माझ्या जीवनातली सर्वश्रेष्ठ मॅच असे कॅप्शन दिले आहे.
साईना- कश्यप साधेपणाने विवाहबद्ध
साईना आणि कश्यप यांनी विवाह करण्याचे ठरविल्याची घोषणा केल्यावर साईनाने एका मुलाखतीत २० डिसेंबरपासून ती प्रीमिअर लीग मध्ये खेळणार असल्याचे तसेच त्यानंतर टोक्यो ऑलिम्पिक क्वालिफाय साठी खेळायचे असल्याने विवाहासाठी १६ डिसेंबर ही एकच तारीख रिकामी असल्याचे म्हटले होते मात्र या दोघांनी १४ डिसेंबरलाच विवाह उरकला आहे. हा विवाह अगदी जवळच्या नातेवाईकांच्या उपस्थितीत साजरा झाला असून त्या निमित्त मोठा स्वागत समारंभ नंतर केला जाईल असे समजते.