रशियात साजरा होतो डासांचा उत्सव

mosquito
डास आवडतात असे म्हणणारा माणूस जगात सापडणे शक्य नाही. इतकेच काय पण डास कायमचे कसे नष्ट करावेत यासाठी जगभरात सतत संशोधन सुरु आहे. मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनिया या सारखे जीवघेणे आजार होण्यास डास कारणीभूत असतात. त्यामुळे एन केन प्रकारेण डासांचा विनास हेच मानवजातीचे पहिले प्राधान्य राहिले आहे. रशियात मात्र जगभरात द्वेष केल्या जाणाऱ्या डासांच्या सन्मानार्थ दरवर्षी उत्सव केला जातो. बेरेजीन्की प्रांतात हा उत्सव साजरा दरवर्षी ऑगस्ट मध्ये कित्येक वर्षे साजरा केला जात आहे.

हा उत्सव तीन दिवस चालतो. या गावातील स्थानिक तलावाकाठी हजारो लोक एकत्र येतात. एकप्रकारची हि जत्राच. विशेष म्हणजे येथे टेस्टी मुलगी हे स्पर्धा या दिवसात आयोजित केली जाते. चविष्ट मुलगी या स्पर्धेत उतरणाऱ्या मुलीना थोडे कपडे घालून या तलावात २० मिनिटे उभे राहावे लागते. त्यात ज्या मुलीला सर्वात जास्त डास चावतील तिला टेस्टी मुलगी खिताब दिला जातो. या उत्सवात लहानांपासून वृद्धापर्यंत सर्व वयोगटातील लोक सामील होतात.

अर्थात टेस्टी गर्ल स्पर्धेत डास चावल्याने येऊ शकणारी आणीबाणी लक्षात घेऊन डॉक्टरांची एक टीम तैनात केली जाते. डासांचा हा उत्सव फक्त रशियातच होतो असे मात्र नाही. रशियाची प्रतिस्पर्धी अमेरिकेतील टेक्सास येथेही दरवर्षी ग्रेट टेक्सास मॉस्क्यूटो महोत्सव साजरा केला जातो.

Leave a Comment