पर्थ – आजपासून पर्थच्या मैदानावर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात दुसरा कसोटी सामना रंगला आहे. भारत ४ सामन्यांच्या मालिकेत १-० ने आघाडीवर आहे. भारतीय संघ विजयी लय कायम ठेवण्याच्या उद्देशाने मैदानात खेळत आहे, तर भारताकडून सलामीचाच कसोटी सामना मायभूमीतच ऑस्ट्रेलियाने गमावल्यामुळे ऑस्ट्रेलियन संघाचा दुसरा सामना जिंकून मालिकेत बरोबरी साधण्याचा मानस आहे. पण विराटच्या दिशेने या सामन्यात नाणेफेकीचा डाव मात्र झुकला नाही आणि नकोशा यादीत त्याला स्थान मिळाले.
नकोशा यादीत विराटचा समावेश
ऑस्ट्रेलियाच्या कर्णधाराने नाणेफेक जिंकली आणि प्रथम फलदांजीचा निर्णय घेतला. त्यामुळे नाणेफेक गमावून विराट कोहलीने एक विचित्र विक्रम केला. विराट कोहलीने एकाच वर्षात कसोटी क्रिकेटमध्ये नवव्यांदा नाणेफेक गमावली. विराट कोहली हा नाणेफेकीच्या बाबतीत तिसऱ्या क्रमांकाचा कमनशिबी भारतीय कर्णधार ठरला. या आधी २०१० मध्ये १२ कसोटी सामन्यात महेंद्रसिंग धोनी नाणेफेक हरला होता, तर सौरव गांगुली २००२ साली ११ वेळा नाणेफेकीत पराभूत झाला होता.