नरेंद्र दाभोळकर हत्याप्रकरणातील तिघांना जामीन मंजूर

narendra-dabholkar
पुणे – पुण्याच्या सत्र न्यायालयाने नरेंद्र दाभोळकर हत्याप्रकरणातील अमोल काळे, राजेश बंगेरा आणि अमित देगवेकर यांना जामीन मंजूर केला आहे. न्यायालयाने हा निर्णय केंद्रीय अन्वेषण विभागाने ९० दिवसांत त्यांच्यावर आरोपपत्र दाखल केले नसल्याने दिला आहे.

अंधश्रद्ध निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची २० ऑगस्ट, २०१३ मध्ये गोळी घालून हत्या करण्यात आली होती. त्यांच्या हत्येच्या काही महिन्यांनंतर आरोपींना पकडण्यात सीबीआयला यश आले. सीबीआयने अमोल काळे, राजेश बंगेरा व अमित देगावकर या तिघांना अटक केली. पण सीबीआयने तीन आरोपी अटक केल्यानंतर ९० दिवसांमध्ये न्यायालयात त्यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल करणे आवश्यक होते. मात्र, त्यानंतरही आरोपपत्र दाखल झाले नाही. तसेच आरोपपपत्र दाखल करण्यासाठी मुदतवाढही मागितली नाही. हे कारण पुढे करत आरोपींच्या वकिलांनी तिघांना जामिन मंजूर करण्याबाबतचा अर्ज न्यायालयात केला होता.