शिक्षण विभागाने तोडले अक्क्लेचे तारे; संस्कृत सारिका पुस्तकात जिजाबाई शिवाजी महाराजांच्या पत्नी

sansrit
पुणे – छत्रपती शिवाजी महाराजांची वंशावळ ११ वीच्या संस्कृत सारिका या नावाच्या पुस्तकात दाखवण्यात आली आहे. आई जिजाबाई यांचा उल्लेख महाराजस्यया वंशावळीत शिवाजी महाराजांच्या ‘पत्नी’ म्हणून करण्यात आला आहे. अतिशय वादग्रस्त असे हे संस्कृत विषयाचे पुस्तक असून जाणीवपूर्वक महाराजांची बदनामी करण्याचा हा कट केला जातो आहे का? असा प्रश्न संभाजी ब्रिगेडने उपस्थित केला आहे.

लातूरच्या निकिता पब्लिकेशनचे संस्कृत सारिका हे पुस्तक असून ते राजेंद्र शास्त्री (गायकवाड) यांनी लिहिले आहे. शिवाजी महाराजांच्या मातेचा उल्लेख त्यांनी पत्नी म्हणून कसा केला? इतिहासाचा विपर्यास करण्यासाठी हा जाणीवपूर्वक करण्यात आलेला खोडसाळपणा आहे असेही संभाजी ब्रिगेडने म्हटले आहे.

त्वरित संस्कृत सारिका हे वादग्रस्त पुस्तक रद्द करावे. राष्ट्रमाता जिजाऊंची संबंधित पुस्तकात बदनामी करणाऱ्या सगळ्यांवर सामाजिक तेढ निर्माण केल्याप्रकरणी लेखक, वितरक, प्रकाशकव अभियानाचे प्रमुख यांच्यावर महापुरुषांची बदनामी प्रकरणी राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी संभाजी ब्रिगेड आणि जिजाऊ ब्रिगेडने केली आहे.